News Flash

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे.

Bigg Boss 13, Bigg Boss 13 winner, Sidharth Shukla, Sidharth Shukla passes away, Sidharth Shukla died,
वयाच्या ४०व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.

सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 11:42 am

Web Title: bigg boss 13 winner sidharth shukla passes away avb 95
Next Stories
1 धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; ४५ मुलांसह १०० जणांंची प्रकृती बिघडली
2 न्यूयॉर्कमध्ये पूरस्थितीमुळे आणीबाणी घोषित!; तासाभरात विक्रमी पावसाची नोंद
3 एकाच कुटुंबातील चौघांना रेल्वेची धडक; छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पाहून स्थानिक संतापले
Just Now!
X