News Flash

गुप्तेश्वर पांडे यांचं आज बिहारच्या राजकारणात पदार्पण, ‘या’ पक्षाचा झेंडा घेणार हाती

नितीश कुमार यांची घेतली होती भेट

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे. (संग्रहित छायाचित्र)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे राजकारणात पदार्पण करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. पांडे हे बिहारमधील सत्ताधारी पक्षात जाणार असून, आज संध्याकाळी अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून पांडे चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी बोललं जात होतं.

आयपीएस अधिकारी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांचं नाव सुशांत प्रकरणामुळे चर्चेत आलं होतं. त्यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांचा राजीनामा मंजुर करण्यात आला. कार्यकाळ संपण्यासासठी अवघे पाच महिने शिल्लक असतानाच त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. त्यांच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती.

काही माध्यमांनी पांडे हे शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये (संयुक्त जनता दल) प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. आज एएनआयनं त्यांच्या जदयूतील पक्षप्रवेशाविषयीचं वृत्त दिलं आहे. गुप्तेश्वर पांडे आज सायंकाळी संयुक्त जनता दलात प्रवेश करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

गुप्तेश्वर पांडे यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेविषयीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर पांडे यांनी भूमिका मांडतांना “मी या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आणि डीजीपी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिल्यानं त्यांचे आभार व्यक्त करण्यास आलो आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असं पांडे म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 3:14 pm

Web Title: bihar assembly election gupteshwar pandey former dgp of bihar join jdu this evening bmh 90
Next Stories
1 भारताने लडाखमध्ये तैनात केले T-90, T-72 रणगाडे; उणे ४० डिग्री तापमानातही चीनला उत्तर देण्यास तयार
2 “अगोदर घरात दिवा त्यानंतर…” म्हणत ओवेसींनी साधला मोदींवर निशाणा
3 …तर आज ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ची गरजच नसती पडली – मोदी
Just Now!
X