News Flash

भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं; चिराग पासवान यांचं अमित शाह यांना पत्र

एनडीएतील जागा वाटपाचा तिढा

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मात्र, एनडीए आणि महाआघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महाआघाडीपेक्षा एनडीएमध्ये जागा वाटपावरून खेचाखेची सुरू असल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी जागा वाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच पत्र लिहिलं आहे. अपेक्षित जागा न मिळाल्यास जदयू विरोधात उमेदवार देण्याचे संकेत पासवान यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत.

आणखी वाचा- …तर तेजस्वी यादव पहिल्याच कॅबिनेट बैठकीत घेणार ‘हा’ मोठा निर्णय

‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्यानं एनडीएतील जागावाटपासंदर्भातील वृत्त दिलं आहे. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधी वातावरण असल्याचं चिराग पासवान यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

आणखी वाचा- Video : शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताना भाजपा खासदाराने काढला पळ

त्यानंतर पुन्हा एकदा चिराग पासवान यांनी जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित करत अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. चिराग पासवान यांनी ३३ जागांची मागणी केल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या जागांपैकी २ जागांचीही मागणी केली आहे. अपेक्षित जागां न मिळाल्यास मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बिहारमधील एनडीएत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा- बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या ३०० कंपन्या राहणार तैनात

चिराग पासवान यांनी भाजपा नेतृत्त्वाला यापूर्वीच एक फॉर्म्युला सुचवलेला होता. लोजपाला राज्यसभेची जागा न दिल्यास विधानसभेच्या जागा वाटपांची घोषणा करतानाच बिहारमध्ये एनडीएचं सरकार आल्यास भाजपाबरोबर लोजपातून चिराग पासवान यांना उपमुख्यमंत्री करण्याचीही घोषणा करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 12:30 pm

Web Title: bihar assembly polls chirag paswan amit shah nda jdu seat share bmh 90
Next Stories
1 “यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”; केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती
2 Video : शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताना भाजपा खासदाराने काढला पळ
3 पोलीस उपनिरीक्षकाने प्रेयसीवर गोळी झाडून रस्त्यात फेकलं
Just Now!
X