बिहारमधील डेहरीमधून ३० वर्षांपूर्वी आपल्या पालकांवर नाराज होऊन घरातून पळून गेलेला इंजिनिअर परत आला आहे. अनेकांना या घटनेवर विश्वास बसत नसला तरी रोहतास जिल्ह्यामध्ये खरोखर ही घटना घडली आहे. सत्यप्रकाश गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. आई-बाबा आपले लग्न लावून देतील म्हणून ते १९९० साली घर सोडून पळून गेले होते.

१९९० ला काय घडलं?

वयाच्या २६ व्या वर्षी सत्यप्रकाश यांनी इंजिनियरिंगची अभ्यास सुरु केला होता. मात्र त्याचवेळी त्यांच्या आई- वडीलांनी त्याच्या लग्नासाठी मुली शोधण्यास सुरुवात केली. सत्यप्रकाश यांना शिकायचे असल्याने लग्न करण्यात त्यांना विशेष रस नव्हता. मात्र पालकांनी त्यांच्यावर दबाव आणल्याने त्यांना काहीच करता आले नाही. हुशार बुद्धीच्या सत्यप्रकाश यांनी अखेर घरातून पळून जाण्याचा निर्णय़ घेतला. एका रात्री कोणालाही काहीच न सांगता त्यांनी घरातून पळ काढला. त्यानंतर ३० वर्षांनी वाराणसीमधील एका आश्रमाममध्ये सत्यप्रकाश नातेवाईकांना सापडले. सत्यप्रकाश यांना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन गेले. तरुणपणी पळून गेलेले सत्यप्रकाश हे आता उतरत्या वयामध्ये घरी परतले आहेत.

सर्वांनाच झाला आनंद

सत्यप्रकाश घरी आल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या परत येण्याची बातमी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरल्यानंतर ओळखीच्या अनेकांनी घरी जाऊन सत्यप्रकाश यांची भेट घेतली. अनेकांना तरुणपणी पळून गेलाला सत्यप्रकाश हाच आहे का असा प्रश्नही काहींना पडला.

भावांचीही लग्न झाली…

सत्यप्रकाश यांचा जन्म १९६४ साली झाला. त्यानंतर इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना लग्न करण्याची इच्छा नव्हती. मात्र त्यांचे पालक त्याचं ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळेच सत्यप्रकाश यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष घरातील लोक त्यांची वाट बघत होते मात्र ते परतले नाही. दरम्यान सत्यप्रकाश यांच्या लहान भावांची लग्न झाली, त्यांना मुलंही झाली. आपल्या मोठ्या काकांना पहिल्यांदाच भेटलेली ही मुलेही सत्यप्रकाश यांच्या परत आल्याने आनंदात आहेत.

आईचा मृत्यू…

सत्यप्रकाश परत येईल या आशेवर असणाऱ्या त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र ३० वर्षांनंतर मुलगा परत आल्यानंतर त्यांच्या वडीलांना आश्रू अनावर झाले. केवळ लग्न करायचं नाही म्हणून घर सोडून पळून गेलेला मुलगा परत आल्यामुळे वडीलांच्या आनंदाला पारावर उरला नाही.