News Flash

नितीशकुमार यांच्या ताफ्यातील कारला अपघात; ६ पोलीस जखमी

ट्रकला ओव्हरटेक करताना घडली घटना

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. (संग्रहित)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा किशनगंजहून पाटणा येथे परतताना ही दुर्घटना घडली. या अपघातात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सुपौल येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वाहनांचा ताफा किशनगंजहून पाटणाकडे येत होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५७ वरील सुपौल – कोसीदरम्यान टोलनाक्यानजीक ताफ्यातील कारला अपघात झाला. या अपघातात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. नितीशकुमार किशनगंजमधील कटिहार येथून राजधानी एक्स्प्रेसने पाटणा येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा रस्तेमार्गाने पाटणा येथे जात होता. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गावर सुपौल येथे एका ट्रकला ओव्हरटेक करताना ताफ्यातील कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या भीषण अपघातात ६ पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 9:53 am

Web Title: bihar chief minister nitish kumar convoy car accident 6 policemen injured
Next Stories
1 काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले; २ पोलीस शहीद, १ जखमी
2 Presidential poll : राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत ‘मेट्रो मॅन’ची एन्ट्री; ई. श्रीधरन NDA चे उमेदवार?
3 दार्जिलिंगमध्ये अस्थिरता
Just Now!
X