लहान व्यापाऱयांनी काळाबाजार केला तर काही बिघडत नाही. त्यास गुन्हा म्हणता येणार नाही त्यामुळे व्यापाऱयांनी चिंता करण्याची गरज नाही असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी केले आहे. ते व्यापाऱयांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते.
ते म्हणाले की, धंद्यात फायदा व्हावा यासाठी लहान व्यापारी किरकोळ प्रमाणात काळाबाजार करत असतात याची मला जाणीव आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना हे करावे लागते. पण, काळजी करू नका अशा किरकोळ प्रमाणात काळाबाजार केल्याने तुम्हाला कोणी गुन्हेगार ठरवणार नाही अथवा राज्यसरकारही तुमच्यावर कोणती कारवाई करणार नाही. त्यामुळे निश्चिंत रहा.” असेही मांझी म्हणाले.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी लहान व्यापाऱयांनी किरकोळ प्रमाणात काळाबाजार केल्याने काही बिघडत नाही असे मांझी यांना वाटते.