बिहारमधील कटिहार येथे पत्नीने पतीची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा अवघ्या ६० तासांमध्ये लावत आरोपींना अटक केलीय. मुफ्फसिल पोलीस स्थानकाच्या हद्दीमधील भट्टा टोला येथे २० जून रोजी ट्रक चालक धर्मेंद्र रविदासची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी हाती घेतल्यानंतर एका मोठ्या कटाचा खुलासा झाला. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार धर्मेंद्रची पत्नी सजली हिनेच आपला प्रियकर राजू कुमारच्या मदतीने पतीची हत्या केलीय.

नक्की वाचा >> गुजरातमधील धक्कादायक प्रकार… मास्क न घातल्याचं कारण देत ताब्यात घेतलेल्या महिलेवर हवालदाराने केला बलात्कार

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Illegal occupation of Lalit High School ground in Dombivli by locals case filed against fourteen people
डोंबिवलीतील ललित हायस्कूलच्या मैदानाचा स्थानिकांकडून बेकायदा ताबा, चौदा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल

धर्मेंद्रच्या हत्येचा कट बंधन बँकेचा कर्मचारी आणि सजलीचा प्रियकर राजूने रचला होता. राजूने यासाठी संजीत पंडितला सुपारी दिली होती. संजीतला या हत्येसाठी ठरलेली रक्कम देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती पत्रकारांना दिली. त्यावेळी कटिहार पोलिसांचे पोलीस अधिक्षक विकास कुमार यांनी या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल आणि आठ न वापरलेल्या गोळ्याही जप्त करण्यात आल्यात.

नक्की वाचा >> गुजरातमध्ये दोन महिन्याच्या बाळाला 24*7 पोलीस सुरक्षा; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमसंबंधांमधून धर्मेंद्रची हत्या करण्यात आलीय. मरण पावलेल्या धर्मेंद्रची पत्नी सजली देवी आणि बँक कर्मचारी राजू कुमार यांचे मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. त्याचप्रमाणे बंधन बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदावर काम करणाऱ्या राजूने सजलीचा पती धर्मेंद्र याला ९० हजाराचं कर्ज मिळवून दिलं होतं. धर्मेंद्रची हत्या केल्यानंतर हे कर्ज कोणालाच फेडावं लागणार नाही आणि आपण सुखाने संसार करु असा या दोघांचा विचार होता. हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सजलीला धर्मेंद्रपासून दोन मुलं आहेत.

कटिहारमध्ये झालेल्या या हत्येचा उलगडा पोलिसांनी अवघ्या ६० तासांमध्ये केल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपला गुन्हा कबुल केलाय. आपण थेट या कटामध्ये सहभागी नव्हतो असं धर्मेंद्रची पत्नी सजलीने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं आहे. मात्र राजूसोबत प्रेम संबंध होते का या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिलं नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.