बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या वेळी गुप्त मतदान घ्यावे, अशी मागणी भाजपने शुक्रवारी केली.मांझी सरकारचे भवितव्य ठरविण्यासाठी सदस्यांना गुप्त मतदान करू द्यावे, अशी भाजपची मागणी असल्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले. विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी हे तटस्थ राहण्याबद्दल मोदी यांनी साशंकता व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आदेशावरून चौधरी निर्णय घेतात, असा आरोप असल्याचेही मोदी म्हणाले.