News Flash

ही माझी शेवटची निवडणूक; नितीश कुमारांनी काढलं भावनिक अस्त्र

'अंत भला, तो सब भला' असा डायलॉगही त्यांनी यावेळी मारला

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर केले. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते. आपली ही शेवटची निवडणूक असल्याने जनतेने जेडीयूला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच पक्षाच्या विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुर्निया जिल्ह्यातील प्रचारादरम्यान नितीश कुमार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान नितीश कुमार यांच्या प्रचारादरम्यान त्यांना अनेक निषेध आंदोलनांना सामोर जावं लागलं हे विशेष. यावेळी त्यांनी ‘अंत भला, तो सब भला’ असा डायलॉगही मारला.

नितीश कुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर लोकजनशक्ती पार्टीचे नेते अजय कुमार म्हणाले, “मी कायमच नितीश कुमार यांनी निवृत्त व्हावं या मताचा होतो. आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केलीच आहे तर त्यांनी जेडीयूतील मुख्यमंत्रीपदासाठीच्या नव्या चेहऱ्याची घोषणा करावी.”
तर राष्ट्रीय लोकसमाज पार्टीचे प्रमुख उपेंद्र खुशवाहा यांनी नितीश कुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्यांचे आभार मानले आहेत. तसेच कुमार यांना आशीर्वाद देऊन त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला.

नितीश कुमार यांनी अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेवर आश्चर्य व्यक्त करताना काँग्रेसनं म्हटलं की, “नितीश कुमार यांचं हे राजकीय विधान असू शकतं, ते आता मतांसाठी इमोशनल कार्ड खेळू पाहत आहेत.” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदम मोहन झा म्हणाले, “नितीश कुमार यांना आपण या निवडणूक हरणार असल्याचं जाणवत असल्यानेच त्यांनी अशी घोषणा केली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 5:22 pm

Web Title: bihar election 2020 are my last polls says nitish kumar aau 85
Next Stories
1 दहावीतील मुलीची इंग्रजी ऐकून शशी थरूर झाले क्लीनबोल्ड, म्हणाले, अर्थ काय होतो?
2 पराभवानंतरही ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं नाही तर काय होणार?
3 कलम ३७० : …म्हणून बायडेन यांचा विजय वाढवू शकतो भारताची चिंता
Just Now!
X