23 November 2020

News Flash

बिहारमध्ये निवडणुकीअगोदर ‘यूपीए’ला झटका;‘रालोसपा’ने साथ सोडली!

‘बसपा’ला सोबत घेत तिसरी आघाडी निर्माण करणार

संग्रहीत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून, तेथील राजकारण अधिकच गरम झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीअगोदरच यूपीएला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी(रालोसपा)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी यूपीएची साथ सोडत. बसपाला सोबत घेऊत तिसरी आघाडी निर्माण करणार आहे. याबाबत त्यांनी आज घोषणा केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

आणखी वाचा- भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं; चिराग पासवान यांचं अमित शाह यांना पत्र

दरम्यान, उपेंद्र कुशवाह हे या अगोदर ‘एनडीए’च्या देखील संपर्कात होते. मात्र जागा वाटपात एकमत न होऊ शकल्याने त्यांनी आता रालोसपा बसपा व विकासशील इंसान पार्टीला सोबत घेऊन बिहारच्या निवडणुकीत तिसरी आघाडी निर्माण करण्याची तयारी केली आहे. या आघाडीचे नेतृत्व कुशवाह यांच्याकडेच असणार आहे.

आणखी वाचा- गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये पक्षप्रवेश, विधानसभा निवडणूक लढवणार

उपेंद्र कुशवाह राष्ट्रीय जनता दलचे नेता आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाही. याचबरोबर महाआघाडीतील जागा वाटपावर देखील ते नाराज होते. यामुळेच त्यांनी यूपीएचा हात सोडून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे देखील जागा वाटपावर एकमत न होऊ शकल्याने आता त्यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याच निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या ३०० कंपन्या राहणार तैनात

खरंतर उपेंद्र कुशवाह हे रालोसपा महाआघाडीचा घटक बनण्याअगोदर एनडीए सोबतचं होते. मात्र, २०१८ मध्ये कुशवाहा एनडीए पासून विभक्त झाले. ते रालोसपाचे संस्थापक आहेत. मोदी सरकारमध्ये २०१४ मध्ये त्यांना ग्रामीण विकास, पंचायत राज, पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाचे राज्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यानंतर कॅबिनेटमधील फेरबदलानंतर कुशवाह यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा देत एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. मग ते महाआघाडीचा घटक बनले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 2:06 pm

Web Title: bihar election 2020 rlsp breaks with upa msr 87
Next Stories
1 “युद्धाची स्थिती नाही, पण…”; IAF प्रमुखांचे महत्त्वाचे विधान
2 “राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही”; सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय
3 देशात चीनविरोधी वातावरण असतानाही एमजी मोटर्स करणार १ हजार कोटींची गुंतवणूक
Just Now!
X