29 October 2020

News Flash

Bihar Elections: मतांच्या टक्केवारीत भाजपाची जोरदार मुसंडी; ठरला एकमेव राष्ट्रीय पक्ष

भाजपा दोन अंकी संख्या गाठणारा बिहारमधील एकमेव राष्ट्रीय पक्ष ठरला

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय पक्षांची बिहारमधील मतांची टक्केवारी गेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये वाढलेली दिसत आहे. निवडणूक डेटा विश्लेषणानुसार, भाजपाने यामध्ये बाजी मारलेली दिसत असून दोन अंकी संख्या गाठणारा बिहारमधील एकमेव राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड बिहारपासून वेगळं झाल्यानंतर राज्यात एकूण चार विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.

बिहार निवडणुकीत सहा राष्ट्रीय पक्षांची एकूण मतांची टक्केवारी पाहिली तर २००५ मधील २३.५७ टक्क्यांपासून ते २०१५ मध्ये ३५.६ टक्क्यांवर पोहोचली आहे. एनडीएच्या कार्यकाळात बिहारचं विभाजन झाल्यानंतरही भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. २००५ मध्ये मतांची टक्केवारी १०.९७ टक्के होती, जी २०१५ मध्ये २४.४२ टक्क्यांवर पोहोचली. यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे २०१५ मध्ये भाजपाने एकूण १५७ जागांवर निवडणूक लढवली होती.

२०१५ मधील विधानसभा निवडणूक वगळाच भाजपा जेडीयूसोबतच लढली आहे. इतर पक्षांनीही जास्त जागांवर निवडणूक लढली होती, मात्र त्यांच्या मतांच्या टक्केवारीत जास्त वाढ झाली नाही.

आणखी वाचा- नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला – चिराग पासवान

रणनीती आखत बसपाने २०१५ मध्ये सर्वाधिक २२८ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपाने १५७, सीपीआयने ९८, सीपीएमने ४३, काँग्रेसने ४१ आणि एनसीपीने ४१ जागांवर निवडणूक लढवली. पण काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट झालेली पहायला मिळालं.

आणखी वाचा- ज्याच्याकडे ५६ इंची छाती, तोच करु शकतो गरीबांची सेवा – जे. पी. नड्डा

२००५ मध्ये भाजपाने १०२ जागांवर उमेदवार दिले होते, २०१५ मध्ये ही संख्या १५७ होती. त्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी १०.९७ वरुन २४.४२ टक्क्यांवर पोहोचली होती. काँग्रेसने २०१० मध्ये सर्वाधिक २४३ आणि २०१५ मध्ये फक्त ४१ जागांवर उमेदवार दिले. २००५ मध्ये ५ टक्के असणारी मतांची टक्केवारी मात्र फक्त ८.३७ टक्के झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 11:31 am

Web Title: bihar elections bjp vote share has surged since 2005 sgy 87
Next Stories
1 “पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे”; GDP वरुन राहुल यांचा मोदी सरकारवर निशाणा
2 दिलासादायक! भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८७.३५ टक्क्यांवर
3 Video : पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदारावर स्थानिकांनी फेकल्या चप्पला
Just Now!
X