01 March 2021

News Flash

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी 10 गाड्या जाळल्या, एकाचा मृत्यू

बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हल्ला केला

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातल्याचं समोर आलं आहे. बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हल्ला केला. नक्षलवाद्यांनी येथे अंदाधूंद गोळीबार केला. 100 पेक्षा जास्त राउंड फायरिंग करण्यात आली, यामध्ये आमदार राजन सिंह यांचे चुलते नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला तर  10 ते 12 जण जखमी झाले. याशिवाय नक्षलवाद्यांनी चार बसेससह जवळपास 10 गाड्या जाळल्या.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सशस्त्र नक्षली औरंगाबादच्या देव येथील गोदाम परिसरात पोहोचले आणि धुमाकूळ घालायला सुरूवात केली. त्यांनी अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि गाड्यांची जाळपोळ केली. याबाबत माहिती मिळताच सीआरपीएफ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत नक्षलवादी फरार झाले होते. दरम्यान पोलिसांनी येथे नाकाबंदी केली असून नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 3:32 pm

Web Title: bihar naxal attack aurangabad set ablaze vehicles one died
Next Stories
1 दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन कालवश
2 तर तुम्हीही रिजेक्ट करु शकणार बॉसचा कॉल आणि मेल
3 नग्न प्रवाशामुळे दुबई-लखनौ विमानात गोंधळ
Just Now!
X