बिहारच्या कैमूर जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका गोदामात जप्त करण्यात आलेल्या बियरचे 200 कॅन रिकामे आढळले आहेत. ही दारू उंदरांनी फस्त केल्याचे कारण येथील अधिकाऱ्यांनी दिलं आहे. यापूर्वीही बिहारमध्ये तब्बल नऊ लाख लिटर दारू गायब झाली होती, त्यावेळीही अधिकाऱ्यांनी उंदरांवर आरोप केला होता.

कैमूर जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांत जप्त करण्यात आलेली दारू भभुआ येथील गोदामात ठेवण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने 2016 पासून काढलेल्या मोहिमांमध्ये ही दारू तस्करांकडून जप्त करण्यात आली होती. सोमवारी ही दारु नष्ट करण्याचे काम सुरू असताना 200 बियरच्या कॅन रिकाम्या आढळल्या. उंदरांनी या बियरच्या कॅन कुरतडल्या, त्यामुळे त्या सर्व कॅनला छिद्र पडलं होतं, परिणामी त्या कॅन रिकाम्या झाल्या असू शकतात असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं आहे. भभुआ जिल्ह्याचे डीएम अनुपम कुमारींनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील जप्त केलेली दारु नष्ट करण्याची मोहिम सुरू होती. ज्यावेळी गोदामात पोहोचलो तेव्हा बियरच्या कॅनला छिद्र दिसत होतं आणि त्यातून दारु गायब होती.

Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
Jahal Naxal supporter who kidnapped and killed a policeman was arrested
गडचिरोली : पोलिसाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या जहाल नक्षल समर्थकास अटक
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष

दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये पोलिस ठिकठिकाणी छापेमारी करुन दारु जप्त करतात, त्यानंतर ही दारु गोदामात ठेवली जाते आणि नंतर ती नष्ट करण्यात येते. बिहारमध्ये एप्रिल 2016 पासून दारुबंदी आहे. गेल्या वर्षीही येथे तब्बल नऊ लाख लिटर दारू गायब झाल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर उंदरांनी ही दारु फस्त केल्याचं खुद्द पोलिसांनीच जाहीर केले होते. त्यामुळे दारूबंदी झाल्यापासून बिहारमधील उंदीर बेवडे झालेत की काय असा प्रश्न एखाद्याला नक्कीच पडू शकतो.