News Flash

पाटणा: तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मेंदूतून काढला क्रिकेट चेंडूएवढा ब्लॅक फंगस!

बिहारच्या पाटण्यात एका व्यक्तीच्या मेंदूत ब्लॅक फंगसची लागण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत क्रिकेट चेंडूएवढा ब्लॅक फंगस काढला.

बिहारमधील पाटण्यात एका व्यक्तीच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूतून क्रिकेट बॉलएवढी ब्लॅक फंगस काढण्यात आला. (प्रातिनिधीक फोटो, सौजन्य PTI)

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र हे संकट ओसरत असलं तरी ब्लॅक फंगसचं संकट कायम आहे. करोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. ब्लॅक फंगसच्या महागड्या उपचारांचा खर्च ऐकून सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे अनेकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे. या ब्लॅक फंगसमुळे अनेकांना जीवाला मुकावं लागलं आहे. असं असताना बिहारच्या पाटण्यात एका व्यक्तीच्या मेंदूत ब्लॅक फंगसची लागण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. त्याच्या मेंदूतून क्रिकेट चेंडूइतका मोठा ब्लॅक फंगस काढण्यात आला. इतका मोठा ब्लॅक फंगस बघितल्यानंतर डॉक्टरानाही धक्का बसला. मात्र शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बिहारच्या पाटण्यातील एका ६० वर्षीय व्यक्तीला ब्लॅक फंगस हा आजार झाला होता. त्याच्या मेंदूत ब्लॅक फंगस झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तात्काळ पाटण्यातील गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर ब्रजेश कुमार यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांनी तीन तास शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत त्याच्या मेंदूतून क्रिकेट चेंडूएवढा ब्लॅक फंगस काढण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

धक्कादायक : स्वॅब स्टिक तुटली नी अडकली संरपंचांच्या घशात

पाटण्यातील व्यक्तीला करोनातून बरे झाल्यानंतर थकवा जाणवत होता. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांची त्याची तपासणी केली असता त्याला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं. ब्लॅक फंगस त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुदैवाने त्याच्या डोळ्यांना काही इजा झाली नाही. “शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती. नाकावाटे ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचला होता. थोड्या प्रमाणात डोळ्यांना स्पर्श झाल्याचं दिसून आलं. तो मेंदूत वेगाने मोठा होत असल्याचं दिसून आल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर तीस तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तो ब्लॅक फंगस काढण्यात यश आलं”, असं डॉक्टरांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 4:55 pm

Web Title: bihar patna man underwent surgery of in his brain removed cricket size ball black fungus rmt 84
टॅग : Bihar,Corona,Coronavirus
Next Stories
1 China: गॅस पाइपलाइनचा भीषण स्फोट; १२ जण ठार, १०० जखमी
2 Video : आरारारा खतरनाक… इंग्लंडच्या राणीनं तलवारीनं कापला केक
3 धक्कादायक : स्वॅब स्टिक तुटली नी अडकली संरपंचांच्या घशात
Just Now!
X