दारूबंदीसाठी सरकारच्या मदतीला आता तरूणीही सरसावल्या आहेत. एका विद्यार्थीनीने दारूबंदीसाठी एक मशीन तयार केले आहे. भवानीपूर प्रखंड येथे राहणाऱ्या ऐश्वर्या प्रियाने आगळीवेगळी मशीन तयार केली आहे. या मशीनद्वारे दारू पिण्याऱ्याची माहिती एका क्षणांत मिळणार आहे. एवढेच नाही तर दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर गाडी जागेवरच बंद पडणार आहे.
ऐश्वर्याचे वडिल बिहारमधील पुर्णीयात पत्रकार आहेत. बिहारमध्ये दारूबंदी लागू केल्यापासून ऐश्वर्या त्यावर काम करत होती. ऐश्वर्याच्या मते वाहनांमध्ये जर हे यंत्र लावल्यास अपघात थांबण्यास मदत होईल. ऐश्वर्या मध्य प्रदेशमधील नारायण कॉलेजमध्ये बीटेक करत आहे.
ऐश्वर्या वृत्तसंस्था आईएएमएसला बोलताना म्हणाली की, ‘गेल्या कित्येक दिवसांपासून यावर काम करत आहे. कठोर मेहनतीनंतर मला यश मिळाले आहे. जर सरकारने हे यंत्र वाहनांमध्ये लावले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात.’
ऐश्वर्याने आपल्या या यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना दिले आहे. ऐश्वर्याला या प्रोजक्टसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. इनोव्हेटिव मॉडलसाठी देशभरातून १२५ जणांनी सहभाग नोंदवला होता. ऐश्वर्याच्या आपल्या या प्रोजेक्टचे नाव ‘अल्कोहल डिटेक्टर अॅण्ड अटोमॅटिक इंजन लॉकिंग सिस्टम’ असे ठेवले आहे.
कसे काम करते मशीन –
गाडीच्या डॅश बोर्डवर हे छोटे यंत्र लावावे लागले. या यंत्राची एक तार गाडीच्या बॅटरीला आणि दुसरी तार गाडीच्या इंजिनला लावलेली आहे. जर कोणी दारू पिऊन गाडी चालवत असेल. तर त्या व्यक्तीच्या श्वासामुळे डॅश बोर्डवर असेलेल्या ‘अल्कोहल डिटेक्टर मशीन’मुळे ओळखता येईल. लगेच अल्कोहल डिटेक्टर मशीन बॅटरी आणि इंजिन बंद करेल. जोपर्यंत दारू पिलेला व्यक्ती गाडीवरून उतरत नाही तोपर्यंत गाडी पुन्हा सुरू होणार नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 1:52 pm