News Flash

बिहार : सुशील मोदींना दिल्लाला बोलावलं; नितीश कुमार यांच्या कॅबिनेवटर भाजपात विचारमंथन!

संख्याबळानुसार जास्तीजास्त मंत्रिपदं व महत्वाच्या खात्यांवर भाजपा दावा करण्याची शक्यता

संग्रहीत

बिहारमधील निवडणुकीची रणधुमाळी निकालानंतर संपली असली तरी, आता सत्ता स्थापनेसाठी एनडीएमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. एनडीएने (उद्या)१५ नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित आमदारांची पाटणा येथे बैठक बोलावली आहे. यामध्ये आमदार आपल्या नेत्याची निवड करणार आहेत. तर, कॅबिनेटच्या बांधणीत भाजपा कुठल्याप्रकारची तडजोड करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. संख्याबळामुळे यंदा भाजपाकडून जास्तीत जास्त मंत्रीपद व महत्वाचे विभाग मागितले जाऊ शकतात.

राज्यातील नव्या सरकारच्या निर्मितीवर चर्चा करण्यासाठी आज(शुक्रवार)भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. तर, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे विधीमंडळ पक्षचे नेते निवडण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राजनाथ सिंह हे उद्या पाटणामध्ये होणाऱ्या बैठकीत पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असणार आहेत.

कॅबिनेटमध्ये भाजपाला हव्या जास्त जागा –
प्रचारादरम्यान सांगितल्याप्रमाणे भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहे. मात्र, संख्याबळानुसार कॅबिनेटमध्ये जास्तीत जागा भाजपाला हव्या आहेत. याशिवाय, महत्वपूर्ण खात्यांवर देखील भाजपाचा यंदा दावा असणार आहे. जे अगोदर जदयूकडे असायचे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी सुशील मोदी यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे.
सुशील मोदी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतील. यानंतर तिन्ही नेते मिळून बिहारमध्ये भाजपाची भूमिका काय असेल, हे ठरवतील. याचबरोबर एनडीए आमदारांची संयुक्त बैठक देखील उद्या (१५ नोव्हेंबर) होणार आहे. यामध्ये नितीश कुमार यांची एनडीएचा नेता म्हणून निवड केली जाईल.

दोन उपमुख्यमंत्र्यांची शक्यता –
बिहार निवडणुकीत भाजपा ७४ जागा जिंकून एनडीएत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आतापर्यंत सत्तेची सुत्रधार राहिलेल्या जदयूकडे यंदा ४३ जागा आल्या आहेत. तर, असा देखील अंदाज लावला जात आहे की, उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाकडून अतिमागासवर्गातून एखादे नाव पुढे केले जाऊ शकते. तसेच, याबाबत अद्याप काही निश्चित झालेले नाही की, सुशील मोदींच्या जागेवर कोणाला आणले जाईल. उत्तर प्रदेशप्रमाणे दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्मुला देखील अवलंबला जाऊ शकतो. भाजपाकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आरएसएसशी निगडीत नेते कामेश्वर चौपाल यांच्या नावाची चर्चा आहे. चौपाल हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

नितीश कुमार यांनी राज्यपालांना सोपवला राजीनामा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. यापूर्वी आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 2:09 pm

Web Title: bihar sushil modi called to delhi msr 87
Next Stories
1 इस्रायलचं इराणमध्ये स्पेशल ऑपरेशन, अल-कायदाच्या नंबर दोनच्या दहशतवाद्याला केलं ठार
2 देशात कोणीही सेक्युलर नाही; स्वत:ला सेक्युलर म्हणाणारे सर्वाधिक धर्मांध : संजय राऊत
3 स्वतःमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोदींनी सांगितली त्रिसुत्री; पाहा काय म्हणाले…
Just Now!
X