बिहारमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान बांधकामांना संमती देण्यात आलेली नाही. तसंच कोणत्याही व्यापार विषयक आस्थापनांना संमती देण्यात आलेली नाही. खासगी आणि सरकारी कार्यालयंही बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा जसं की दूध, भाजीपाला, औषधे यांनाच लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. नितीशकुमार सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन लागू केला असून त्यासाठी नवे निर्देशही देण्यात आले आहेत.

करोना रुग्णांची संख्या देशामध्ये वाढते आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. देशभरात करोनाचे ९ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. भारतात ३ लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर ५ लाख ७० हजारांपेक्षा जास्त लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशात करोनाचा प्रादुर्भाव आणि साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय