News Flash

Bihar Election : शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आदित्य ठाकरे, संजय राऊतही स्टार प्रचारकांच्या यादीत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग असून, शिवसेनेनंही बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती यापूर्वी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.


बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. असं असलं तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसंच निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. याव्यतिरिक्त करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मतदारांना एका तासाचा अधिक कालावधी देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या निवडणुकीत तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 10:24 am

Web Title: bihar vidhan sabha election star campaigners list uddhav thackeray aditya thackeray sanjay raut jud 87
Next Stories
1 ‘खड्ड्यात जा’: तैवानचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख न करण्याच्या चीनच्या इशाऱ्यावर सडेतोड उत्तर
2 ‘आत्मनिर्भर भारत’वरून रघुराम राजन यांचा इशारा, म्हणाले…
3 VIDEO: काश्मीरच्या आकाशातील इंडियन एअर फोर्सच्या पराक्रमाची गोष्ट
Just Now!
X