09 March 2021

News Flash

धक्कादायक! पवित्र गंगातीरी बलात्काराचा व्हिडिओ, दोघांना अटक

रविवारी सकाळी पाटणा येथे राहणारी एक महिला गंगास्नानासाठी नदी किनारी गेली. महिला नदीत आंघोळीसाठी उतरली असता दोन नराधमांनी तिला गाठले.

संग्रहित छायाचित्र

बिहारमधील पाटणाजवळ गंगा किनारी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे दोन्ही नराधमांना अटक केली.

रविवारी सकाळी पाटणा येथे राहणारी एक महिला गंगास्नानासाठी नदी किनारी गेली. महिला नदीत आंघोळीसाठी उतरली असता दोन नराधमांनी तिला गाठले. या नराधमांनी तिला फरफटत नदी किनारी आणले. यानंतर एकाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याने बलात्काराचे कॅमेऱ्यात चित्रीकरण केले. हा व्हिडिओ नराधमांनी सोशल मीडियावर अपलोड केला. नराधमांनी धमकी दिल्याने पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने या व्हिडिओची दखल घेतली आणि पीडित महिलेचा शोध घेतला. या आधारे पोलिसांनी दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एका नराधमाला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 12:47 pm

Web Title: bihar woman gangraped while taking dip ganga video went viral two arrested in patna
Next Stories
1 सुजुकीने भारतात लॉन्च केल्या दोन नव्या Off Road बाइक्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
2 S-400 सिस्टिममुळे भारत होणार अमेरिकेपेक्षा ‘पॉवरफुल’
3 खराब अक्षरासाठी न्यायालयाने डॉक्टरांना ठोठावला पाच हजारांचा दंड
Just Now!
X