भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय चर्चा फलदायी झाली असून त्यात भारत-चीन सीमेवरील परिस्थिती, अफगाणिस्तानातील  परिस्थिती या विषयांचा समावेश होता, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.  कोविड १९ मदतीवरही चर्चा झाली असून दोन्ही देशांनी सामायिक मुद्द्यांवर सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

जयशंकर हे अमेरिकेत बायडेन प्रशासनाने सूत्रे हाती घेतल्यानंतर तेथे भेट देणारे पहिलेच भारतीय मंत्री आहेत.  भारत व अमेरिका यांच्यातील जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या प्रश्नावर त्यांनी भर दिला असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे.

जयशंकर यांनी सांगितले की, भारत व अमेरिका लस सहकार्यावरही चर्चा झाली असून लशीचा पुरेसा साठा मिळणार आहे. अमेरिकेने या काळात भारताच्या पाठीशी राहून मदत केल्याबाबत आम्ही आभार मानतो.