कामाचा ताण असल्याने आपण व्हाइट हाऊसमध्ये इंनटर्न असणाऱ्या मोनिका लेवेन्स्की सोबत शरीर संबंध ठेवले होते, असा धक्कादायक खुलासा अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी केला आहे. पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या आयुष्यावर आधारित “हलरी हुलू” या माहितीपटामधील मुलाखतीत बिल क्लिंटन यांनी हा खुलासा केला आहे. तसेच आपल्यामुळे मोनिकाचे आयुष्य उद्धवस्त झाल्याबद्दल त्यांनी तिची माफीही मागितली आहे. या माहितीपटाच्या निमित्ताने बिल यांनी पहिल्यांदाच मोनिकाबरोबरच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.

“मी जेव्हा मोनिकाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझ्यावर कामाचा खूप ताण होता. त्यामुळे कामावरुन दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्यातूनच आमच्यामध्ये शरीरसंबंध निर्माण झाले,” असं क्लिटंन यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. या महितीपटामध्ये हिलरी यांनी “बिल आणि मोनिका यांच्यामधील संबंधांच्या बातम्या जगभरात चर्चेत आल्यानंतर आमचे लग्न तुटणार होते,” असे सांगितले. माहितीपटामध्ये या प्रेमप्रकरणानंतर बिल आणि हिलरी यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं, त्याचा त्यांच्या नात्यावर काय काय परिणाम झाला याबद्दल भाष्य केलं आहे.

Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार
donald trump dictator
“बराक ओबामा ISIS चे संस्थापक, मॉस्कोतील मृतांना तेच जबाबदार”, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हीडिओ व्हायरल!

“या अफेरभोवतीच मोनिकाचे आयुष्य फिरत राहिले हे भयंकर आहे. त्यासाठी मी तिची माफी मागतो,” असंही बिल यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.

हिलरी यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या माहितीपटामध्ये या दोघांचाही अगदी विद्यार्थीदशेपासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. “मी कोणत्याही निवडणुकीसाठी उभी नसल्याने मी या माहितीपटाला होकार दिला,” असं या माहितीपटासंदर्भात बोलताना हिलरी यांनी सांगितले.

नक्की काय आहे हे प्रकरण?

  • नोव्हेंबर १९९५
    अमेरिकेचे ४९ वर्षीय राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि व्हाइट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम करणाऱ्या २२ वर्षीय मोनिका लेवेन्स्कीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
  • मार्च १९९७
    दोन वर्षांनंतर हे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याची घोषणा मोनिका लेवेन्स्कीने केली. बिल आणि आपल्यामध्ये एकूण नऊ वेळा शरिरसंबंध झाल्याचा खुलासा मोनिकाने केला.
  • सप्टेंबर १९९७
    व्हाइट हाऊसमधील कर्मचारी लिंडा ट्रीप हिने मोनिका लेवेन्स्कीबरोबरचा संवाद रेकॉर्ड केला. यामध्ये मोनिकाने लिंडाला तिच्यामध्ये आणि राष्ट्राध्यक्षांमध्ये असलेल्या संबंधांची माहिती दिली होती.
  • जानेवारी १९९८
    मोनिका लेवेन्स्कीने आपल्यात आणि बिल क्लिंटन यांच्यामध्ये कधीच शरिरसंबंध नव्हते असा खुलासा करणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विनंतीवर मोनिकाने या स्वाक्षऱ्या केल्याचे सांगण्यात आलं.
  • १७ जानेवारी १९९८
    मोनिका लेवेन्स्की आणि बिल क्लिंटन यांच्यामधील संबंधांची बातमी पहिल्यांदाच जगासमोर आली.
  • २१ जानेवारी १९९८
    मोनिका लेवेन्स्की आणि बिल यांचे एकमेकांबरोबर शारिरिक संबंध होते असा दावा करणारे हे वृत्त अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केले.
  • २६ जानेवारी १९९८
    अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मोनिकाबरोबर आपले कोणतेच संबंध नव्हते असं स्पष्ट केलं. आपली पत्नी हिलरीबरोबर व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला.

  • २७ जानेवारी १९९८
    टुडे या कार्यक्रमामध्ये हिलरी क्लिंटन सहभागी झाल्या आणि त्यांनी आपली बाजू मांडली. बिल हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केल्यानंतर हा त्यांच्याविरुद्ध त्यांना बदनाम करण्यासाठी रचलेले कट असल्याचे हिलरी यांनी म्हटलं.
  • ६ फेब्रुवारी १९९८
    आपण राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही असं बिल क्लिंटन यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं.
  • ३ ऑगस्ट १९९८
    मोनिकाच्या निळ्या रंगाच्या कपड्यांवर मिळालेल्या रक्ताच्या डागांचा नमुना तपासून पाहण्यासाठी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
  • ६ ऑगस्ट १९९८
    ग्रॅण्ड ज्युरीसमोर मोनिकाने साक्ष देण्यास सुरुवात केली.
  • १७ ऑगस्ट १९९८
    ग्रॅण्ड ज्युरीसमोर बिल क्लिंटन यांनी साक्ष दिली. त्यानंतर टिव्हीच्या माध्यमातून बिल यांनी देशवासियांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी मोनिका लेवेन्स्कीबरोबर आपले संबंध होते असा खुलासा केला.
  • २ ऑक्टोबर १९९८
    सप्टेंबर १९९७ मध्ये व्हाइट हाऊसमधील कर्मचारी लिंडा ट्रीप आणि मोनिका लेवेन्स्कीमध्ये झालेल्या संवादाची रेकॉर्डेड टेप सार्वजनिक करण्यात आली.
  • ११ डिसेंबर १९९८
    द हाऊस ज्युडिशियरी कमिटीने बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग खटला चालवण्याच्या बाजूने निर्णय दिला. यासाठी महाभियोगासाठी ग्रॅण्ड ज्युरीसमोर खोटं बोलणं आणि न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा आरोप बिल क्लिंटन यांच्यावर ठेवण्यात आला. आणि महाभियोगासाठीच्या मतदानास संमती देण्यात आली.
  • १२ डिसेंबर १९९८
    “मी खोटं बोललेलो नाही, मी राजीनामा देणार नाही,” असं बिल क्लिंटन यांनी स्पष्ट केलं.
  • १९ डिसेंबर १९९८
    बिल क्लिंटन यांच्याविरोधातील महाभियोगासाठीचे मतदान पार पडले. यावेळेस बिल क्लिंटन यांनी “राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मी कार्यरत राहील आणि तो मी पूर्ण करेन,” असा विश्वास व्यक्त केला.
  • ७ जानेवारी १९९९
    सिनेटने या प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात केली.
  • १२ फेब्रुवारी १९९९
    सिनेटने ग्रॅण्ड ज्युरीसमोर खोटं बोलणं आणि न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या दोन्ही आरोपांमधून बिल क्लिटंन यांची निर्दोष मुक्तता केली.