News Flash

टिकटॉकचा व्यवसाय मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत?; पण ट्रम्प म्हणाले…

अमेरिकेतही टिकटॉकवर बॅन लागण्याची शक्यता

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्स यांच्यादरम्यान सध्या चर्चा सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. याअंतर्गत मायक्रोसॉफ्ट अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोमवारपर्यंत ही डील पूर्ण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. परंतु अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही टिकटॉकवर बंदी घालू शकतो या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. तसंच ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अन्य कंपन्यादेखील हा व्यवसाय विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनी आपला व्यवसाय विकण्यासाठी ही रणनिती वापरत असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक मोठी कंपनी टिकटॉकचा व्यवसाय विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं. पण त्यांनी या कंपनीचं नाव सांगण्यास मात्र नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या सुरक्षेबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर गुंतवणुकदारांनी बाईटडान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी झांग यामिंग यांना काही प्रस्ताव दिले आहेत. यापैकी कोणत्याही प्रस्तावाला अमेरिकेच्या परदेशी गुंतवणुकीबाबत तयार करण्यात आलेल्या समितीचाही सामना करावा लागेल. तसंच अमेरिकेच्या अँटी ट्रस्ट रेग्युलेटरीचीदेखील मंजुरी घ्यावी लागेल.

अहवालानुसार अमेरिकेत टिकटॉकचं व्हॅल्युएशन २० ते ४० अब्ज डॉलर्सच्यादरम्यान असू शकतं असं सांगण्यात आलं आहे. अनेक कंपन्यांना राजकीय हस्तक्षेपामुळे या व्यवहारात कठिण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असंही सांगण्यात येत आहे. फेसबुक, गुगल, अॅमेझॉन आणि अॅपलच्या सीईओंनादेखील याच आठवड्यात बाजाराती स्पर्धेसंबंधी अमेरिकन काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:08 pm

Web Title: bill gates microsoft planning to buy tiktok america business president donald trump firm on banning jud 87
Next Stories
1 Good News: भारतात मोबाइल उत्पादन कारखाने सुरु करायला फॉक्सकॉन, पेगाट्रॉन, सॅमसंग तयार
2 गौतम गंभीरचं कौतुकास्पद पाऊल, घेतली सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
3 करोनाचा उद्रेक! २४ तासांत ५७,११७ रुग्ण, ७६४ जणांचा मृत्यू
Just Now!
X