पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नेपाळला पोहोचले आहेत. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोदी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. पंतप्रधान झाल्यापासून मोदींचा हा चौथा नेपाळ दौरा आहेपंतप्रधान झाल्यापासून मोदींचा हा चौथा नेपाळ दौरा आहे. आजपासून काठमांडूमध्ये बिम्सेटक परिषदेला सुरूवात होत आहे, या बैठकीत मोदी सहभागी होणार आहेत.

या परिषदेला बंगालच्या उपसागराशी निगडीत दक्षिण आशियातील देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. त्यात भारत,नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान या देशांचा समावेश आहे. या परिषदेत प्रमुख्यानं दहशतवाद, अंमलीपदार्थांची तस्करी, सायबर क्राइम, एकमेकांमधील संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल.आर्थिक संबंधांना बळकटी देण्याचाही परिषदेत प्रयत्न होणार आहे.


या परिषदेनंतर पंतप्रधान मोदी पशुपती नाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.