News Flash

फ्लिपकार्टच्या मुख्याधिकारी पदावरुन बिन्नी बंसल यांना हटवले, कृष्णमूर्ती नवे सीईओ

बिन्नी बंसल यांची मुख्य कार्यकारी पदावर मागील वर्षी नियुक्ती झाली होती.

संग्रहित छायाचित्र

फ्लिपकार्टच्या मुख्य-कार्यकारी अधिकारी पदावरुन फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागेवर कल्याण कृष्णमूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन बंसल आणि बिन्नी बंसल या दोघांनी २००७ मध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती. सचिन बंसल यांना मागील वर्षी मुख्याधिकारी या पदावरुन हटवून त्यांच्या जागी बिन्नी बंसल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

बिन्नी बंसल यांना समूहाचे मुख्याधिकारी बनविण्यात आले आहे तर सचिन बंसल हे समुहाचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर कायम राहतील असे फ्लिपकार्टने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तंत्रज्ञानाचाचे साहाय्य घेऊन फ्लिपकार्टचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे बिन्नी बंसल यांनी म्हटले. कृष्णमूर्ती यांच्या नियुक्तीनंतर सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांच्याजवळ आता त्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीचे पूर्ण नियंत्रण नसणार. गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या नफ्यात सातत्याने घट होत होती त्यामुळे गुंतवणूकदार नाराज होते असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी फ्लिपकार्टने ३०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले होते. जर कामगिरीमध्ये सातत्य नसेल आणि जर तुम्ही उद्दिष्टे गाठली नाहीत तर तुम्हाला केव्हाही घरी जावे लागू शकते असे सचिन बंसल यांनी त्यावेळी म्हटले होते. इतकेच नव्हे तर माझ्या कामगिरीमुळेच मला फ्लिपकार्टचे मुख्याधिकाऱ्याचे पद सोडावे लागले होते असा गौप्यस्फोट त्यांनी या बैठकीदरम्यान केला होता.

बिन्नी बंसल यांची मुख्याधिकारी पदावरुन नियुक्ती होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झाले होते परंतु त्यांची कामगिरी या काळात फारशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांना पदावरुन बाजूला सरकविण्यात आले. कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टमध्ये येण्याआधी टायगर ग्लोबल या कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करीत होते. सध्या ते फ्लिपकार्टमध्ये कॅटेगरी डिजाईन ऑर्गनायजेशनचे प्रमुख या पदावर काम करीत आहे. त्यांच्याच निगराणीखाली या दिवाळीमध्ये फ्लिपकार्टने विक्रमी सेल्सची विक्री केली. टायगर ग्लोबल ही कंपनी फ्लिपकार्टची प्रमुख गुंतवणूकदार आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्टचे प्रत्यक्ष नियंत्रण टायगर ग्लोबलच्याच हाती गेले असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 9:19 pm

Web Title: binny bansal removes as flipkart ceo krishnamurty flipkart ceo sachin bansal
Next Stories
1 ‘अहो आश्चर्यम ! सानिया मिर्झा बॅडमिंटन खेळते’
2 कॅटचे निकाल जाहीर, २० विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण
3 परदेशात अडचणीत सापडलात ? ट्विट करुन मला टॅग करा; सुषमा स्वराजांचे आवाहन
Just Now!
X