News Flash

‘भ्रष्ट व्यक्तीपेक्षा केजरीवाल धोकादायक’

सत्तेत येऊन महिना उलटत असतानाच दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला घरघर लागल्याची चिन्हे आहेत.

| February 5, 2014 01:21 am

सत्तेत येऊन महिना उलटत असतानाच दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला घरघर लागल्याची चिन्हे आहेत. एकीकडे कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन त्यांच्याविरोधात लढणे जिकीरीचे बनले असताना दुसरीकडे पक्षाचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत पक्षाचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल हे एखाद्या भ्रष्ट व्यक्तीपेक्षा धोकादायक असल्याची कडवी टीका बिन्नी यांनी बुधवारी केली.
ते म्हणाले, केजरीवाल यांच्या सरकारचा पाठिंबा आपण काढत आहोत, असे पत्र आजच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना लिहिणार आहे. केजरीवाल एखाद्या भ्रष्ट व्यक्तीपेक्षा जास्त धोकादायक आहेत. ते अत्यंत खोटं बोलत असून, केवळ दिल्लीतील नागरिकांचीच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांची फसवणूक करीत आहेत. दरम्यान, फक्त जनलोकपाल विधेयकाच्या मुद्द्यासाठी आपण आम आदमी पक्षाल पाठिंबा देऊ, असे बिन्नी यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षशिस्त मोडल्याबद्दल बिन्नी यांना ‘आप’ने बाहेरचा रस्ता दाखविला आहे. बिन्नी यांनी ‘आप’ला आव्हान देताना, निवडणुकीपूर्वी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवा, असा पवित्रा घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 1:21 am

Web Title: binny decides to withdraw support to delhi govt
Next Stories
1 देशाचा कारभार करण्यास प्रादेशिक पक्ष सक्षम -देवेगौडा
2 इशरत जहाँ बनावट चकमक : सीबीआयकडून विधी मंत्रालयास दस्तऐवज सादर
3 ‘आधार’च्या घटनात्मक वैधतेबाबत अंतिम सुनावणी सुरू
Just Now!
X