25 February 2021

News Flash

Good news: बायोकॉननं आणलं करोनावर नवीन औषध; एक इंजेक्शन आठ हजार रुपयांना

DCGI कडून इंजेक्शनला परवानगी

करोना व्हायरसचा फैलाव रोखणारं किंवा या आजारावर हमखास लागू पडणारं कुठलही औषध अजून उपलब्ध झालेलं नाहीय. करोनावर वेगवेगळी औषध परिणामकारक ठरतायत. भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे. ही सर्वांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे.

सर्वसामान्यांच जगणं मुश्किल करणाऱ्या करोना व्हायरसवर आणखी एक औषध लाँच झालं आहे. बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे. बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे.

जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रुपाने बायोलॉजिक थेरपीला मंजुरी देण्यात आलीय असे बायोकॉनकडून सांगण्यात आले आहे. करोना व्हायरसची मध्यम ते गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या, श्वासोश्वास करण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

“करोनावर लस येईपर्यंत आपल्याला प्राण वाचवणाऱ्या औषधांची गरज आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला लस मिळाली तरी पुन्हा इन्फेक्शन होणार नाही, याची कुठलीही खात्री नाहीय. आपल्याला अपेक्षित आहे, तसेच ती लस काम करेल याची कुठलीही खात्री नाहीय. त्यामुळे आपल्याला तयार राहिले पाहिजे” असे बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझूमदार शॉ म्हणाल्या.

इटोलीझुमॅबच्या एका इंजेक्शनची किंमत ७,९५० रुपये आहे. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 5:43 pm

Web Title: biocon to launch drug for covid 19 patients priced at rs 8000 per vial dmp 82
Next Stories
1 “हो, भाजपानं मला ऑफर दिली; हवे तितके पैसे घ्या, पण…”; काँग्रेस आमदाराचा दावा
2 पाकिस्तानची कुठलीही आगळीक खपवून घेणार नाही, लष्करप्रमुखांनी दिला इशारा
3 पोरीनं नाव काढलं! CBSE बारावीच्या परीक्षेत मिळवले पैकीच्या पैकी गुण
Just Now!
X