News Flash

कचऱ्याच्या ढिगामुळे ‘राफेल’ फायटर विमानांच्या सुरक्षेला धोका

...म्हणून इंडियन एअर फोर्सने पाठवले पत्र

अंबाला एअर फोर्स स्टेशनच्या परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी इंडियन एअर फोर्सने हरयाणा सरकारला तात्काळ उपायोजना करण्याची विनंती केली आहे. या कचऱ्यामुळे एअर फोर्स तळाच्या परिसरात मोठया प्रमाणात पक्षी येतात. या पक्ष्यांमुळे हवाई दलात नव्याने समावेश करण्यात आलेल्या ‘राफेल’ फायटर विमानांच्या सुरक्षिततेला धोका आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

त्यामुळे आयएएफचे निरीक्षण आणि सुरक्षा महानिर्देशक एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांनी यासंबंधी हरयाणाचे मुख्य सचिव आनंद अरोडा यांना पत्र लिहिले आहे. “२९ जुलैला अंबाला बेसवर दाखल झालेल्या राफेल विमानाच्या सुरक्षेवर आयएएफचे सर्वाधिक लक्ष आहे” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

“अंबाला एअर फोर्स स्टेशनवर मोठया प्रमाणावर पक्षी जमा होतात. एखाद्यावेळी या पक्ष्याची विमानाबरोबर धडक झाली, तर मोठे नुकसान होऊ शकते” असे पत्रात म्हटले आहे. विमानतळ परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे तिथे पक्ष्यांचे उड्डाण सुरु असते. कचरा हटवण्यासाठी अनेक उपायोजना सुचवण्यात आल्या आहेत. यासंबंधी अंबाला एअर फोर्स स्टेशनवरील अधिकाऱ्याने सह आयुक्त आणि अंबालाच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

फायटर विमानांच्या सुरक्षेसाठी छोटया आणि मोठया पक्षांना एअरफिल्डपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. अंबाला एअर फिल्डच्या १० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात एअर फोर्सने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन मोठया पक्ष्यांचा वावर कमी होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 1:24 pm

Web Title: bird menace due to garbage dump danger to rafale in ambala iaf tells haryana govt dmp 82
Next Stories
1 “मोदी सरकारने मुद्दाम भारताला आर्थिक संकटात ढकललं”
2 ‘ही आहेत भारतातील मोदी-निर्मित संकटे’; राहुल गांधींनी दिली यादी
3 “माझा एन्काउंटर केला नाही म्हणून उत्तर प्रदेश सरकारचे आभार”
Just Now!
X