29 September 2020

News Flash

जयंती विशेष: फिल्ड मार्शल सॅम माणेकशांबद्दलच्या ‘या’ १५ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

त्यांनी भारतासाठी पाच मोठ्या लढाया लढल्या

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा

15 Facts You Should Know About Field Marshal Sam Manekshaw: फिल्ड मार्शल सॅम माणेकशा हे नाव ठाऊक नसलेला क्वचित एखादा भारतीय असेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी माणेकशा यांना मिळाली. अर्थात त्यांच्या युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुणांमुळेच. कोणत्याही युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्या अनुषंगाने मुत्सद्देगिरीने श्रेष्ठ युद्धनीती आखणारा सेनापती युद्धातील विजयावर शिक्कामोर्तब करत असतो. ही बाब भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल. पाकिस्तानी लष्कराला १८ दिवसांत शरण आणणारे आणि भारतीय लष्कराचा मानबिंदू ठरलेले माणेकशा यांची आज जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊयात भारतीय लष्कारातील सर्वात लोकप्रिय अधिकारी ठरलेल्या माणेकशा यांच्याबद्दल…

१)
३ एप्रिल १९१४ साली सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमधील एका पारशी कुंटुंबामध्ये झाला.

२)
त्यांचे पूर्ण नाव सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा होते

३)
भारतीय लष्करामध्ये फाइव्ह स्टारपर्यंतची बढती मिळून फिल्ड मार्शल झालेले ते पहिले अधिकारी ठरले

४)
सॅम यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला विरोध केला. त्यावेळस सॅम यांनी मला लष्कारात जाऊ देत नसाल तर लंडनला पाठवा तिथे मी डॉक्टरीची पदवी घेऊन मोठा गायनोकोलॉजिस्ट होईल असे इच्छा वडिलांना बोलून दाखवली. मात्र वडिलांनी या गोष्टीलाही नकार दिला. त्यामुळे सॅम यांनी अखेर भारतीय लष्कराची प्रवेश परिक्षा दिली.

५)
सॅम चाळीस वर्षे भारतीय लष्करात कार्यरत होते

६)
आपल्या चाळीस वर्षाच्या लष्करी सेवेत त्यांनी पाच मोठ्या लढाया लढल्या.

७)
यामध्ये दुसरे महायुद्ध, १९४७चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९६२चे भारत-चीन युद्ध, १९६५चे भारत- पाकिस्तान युद्ध आणि १९७१चे बांगलादेश स्वतंत्र्य झाला ते भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा समावेश होतो.

८) 
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशा यांना भारतीय लष्कर युद्धासाठी तयार आहे का असा प्रश्न विचारला असता, ‘मी कायमच तयार असतो स्वीटी’ (I am always ready sweetie)असे उत्तर दिले होते. ते स्वत: पारसी होते आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधीही पारसीच होते. त्यामुळे भावनिक जवळीक असल्याने ते प्रिय या शब्दाऐवजी स्वीटी हा पारसी शब्द वापरायचे.

९)
युद्धभूमीवर लढताना अनेकदा सॅम हे थोडक्यात बचावले आहेत. १९४२ साली लष्करामध्ये कॅप्टन पदावर असताना ते जपानविरुद्ध बर्मा येथे लढाईमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना ९ गोळ्या लागल्याने ते युद्धभूमीवरच गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांचे सहकारी शिपाय शेर सिंग हे त्यांच्या मदतीला धावून गेल्याने त्यांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले.

१०)
त्यांची अनेक वाक्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकी भारतीय लष्करातील गुरखा बटालीयन आणि गुरखा समाजातील व्यक्तींच्या शौर्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेले दोन ओळीतील मत आजही गुरखा बटालीयन मोठ्या आदबीने वापरते. गुरखा लोकांबद्दल बोलताना एकदा सॅम म्हणाले होते, ‘जर एखादी व्यक्ती मरणाला घाबरत नाही असं म्हणतं असेल तर एकतर ती खोटं बोलतं असेल नाहीतर ती गुरखा असेल’

११)
सॅम माणेकशा हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जात. असेच एकदा त्यांना फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला असता तर काय झाले असते? हा प्रश्न कोणीतरी विचारला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उत्तर दिले की, ‘तर सगळ्या लढाया पाकिस्तान जिंकले असले’

१२)
१९७२ साली राष्ट्रपतींच्या आदेशानुसार त्यांच्या सेवाकाळात सहा महिन्यांनी वाढ करण्यात आली होती. केवळ राष्ट्रपतींचा आदेश असल्याने तब्बेत ठीक नसतानाही त्यांनी कोणताच आक्षेप न घेता ही मागणी मान्य केली.

१३)
सॅम माणेकशा यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

१४)
वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.

१५)
सॅम यांच्या अत्यसंस्काराला कोणताही राजकीय नेता उपस्थित राहिला नाही किंवा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला नाही ही शोकांकिकाच म्हणावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 11:41 am

Web Title: birth anniversary special 15 facts you should know about field marshal sam manekshaw
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातच सापडली १.८ कोटींची रोकड, काँग्रेसने जारी केला व्हिडीओ
2 हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ
3 शिवसेना अल्पसंख्याकांविरोधात, मतदानातून त्यांना धडा शिकवा: मिलिंद देवरा
Just Now!
X