राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाह यांनी ट्विटवरुन देवेंद्र फडणवीस यांना टॅग करुन शुभेच्छा देताना, “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,” असं म्हटलं आहे.

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही अशाच उत्साहाने आणि समर्पित भावनेने महाराष्ट्र राज्यातील लोकांची सेवा करत रहावी. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असं शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”

शाह यांच्याबरोबरच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही फडणवीस यांना ट्विटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांच्यामुळे पक्षाला महाराष्ट्रात बळकटी मिळाली असल्याचेही नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरुन फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केला आहे. “महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनाही ट्विटवरुन फडणवीस यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनाही ट्विटवरुन फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, “महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा,” असं म्हटलं आहे.

आज फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस आहे.