21 October 2020

News Flash

स्वतंत्र तेलंगणासाठी भाजप बांधील – त्रिवेदी

स्वतंत्र तेलंगणाच्या प्रश्नावरून काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपने मात्र आपण स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी वचनबद्ध असल्याचे सष्ट केले आहे. सत्तारूढ पक्ष या प्रश्नावर चालढकल

| July 13, 2013 06:57 am

स्वतंत्र तेलंगणाच्या प्रश्नावरून काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपने मात्र आपण स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी वचनबद्ध असल्याचे सष्ट केले आहे. सत्तारूढ पक्ष या प्रश्नावर चालढकल करीत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी २००६ मध्येही मेहबूबनगर येथे एका जाहीर सभेतही स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला पक्ष बांधील असल्याचे जाहीर केले होते. राजनाथ सिंग हे त्या वेळीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे २००९ च्या निवडणुकांच्या वेळीही पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही स्वतंत्र तेलंगणासाठी पक्ष बांधील असल्याचे स्पष्ट केले होते, असे पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले आहे.
पुढील निवडणुकीत एनडीए सत्तेवर आल्यास उत्तरांचल, छत्तीसगड आणि झारखंडप्रमाणे स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती केली जाईल, असे त्रिवेदी म्हणाले.
काँग्रेस या प्रश्नाबाबत चालढकल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 6:57 am

Web Title: bjp accountable for separate telangana trivedi
टॅग Bjp
Next Stories
1 झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी
2 अश्लील संकेतस्थळांना अटकाव कठीण, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात कबुली
3 सुरेश सोनींचे अधिकार कायम अडवाणींच्या मागणीला केराची टोपली
Just Now!
X