विजेच्या खांबाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने, राजकीय हत्येचा आरोप भाजपने केला होता. मात्र संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचा दावा पुरुलियाचे जिल्हा पोलीस अधीक्षक आकाश मेघरिया यांनी केला आहे. मृत दुलल कुमार हा भाजपचा कार्यकर्त्यां असल्याचा दावा करत पक्षाने १२ तासांच्या जिल्हा बंदची घोषणा केली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

शवविच्छेदनानंतर ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोकोचा प्रयत्न केला. प्रशासनाने बंदचा काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगितले. बंदचा प्रभाव बलरामपूर भागात अधिक जाणवला. येथे दोन भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचे प्रकार घडले होते. या राजकीय हत्या असून, केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.