News Flash

‘जागावाटपाचा वाद नाही’ केंद्रीय मंत्री ; कुशवाह यांचे स्पष्टीकरण

बिहारमध्ये एनडीएचे सरकार यावे, एवढीच आमची इच्छा.

एनडीएच्या घटकपक्षांसाठी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप हा वादाचा मुद्दा राहणार नाही, असे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीने (आरएलएसपी) रविवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कुणाच्याही नावाला पाठिंबा न देण्याच्या युतीच्या निर्णयाचे समर्थन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढण्याचा ‘सर्वोत्तम पर्याय’ आम्ही निवडला असल्याचे पक्षाने सांगितले.
मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाआघाडीतून बाहेर पडण्याचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निश्चितच फायदा होईल, असा दावा आरएलएसपीचे प्रमुख व केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केला.
भाजपने केवळ विधानसभेच्या २४३ पैकी फक्त १०२ जागा लढवाव्यात आणि उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्यात, या आपल्या पक्षाच्या भूमिकेबाबत बोलताना कुशवाह म्हणाले की, अशी मागणी पूर्वी कधीतरी करण्यात आली होती. सध्या जागांसाठी बोलणी सुरू आहेत. त्यामुळे या विषयावर बाहेर बोलणे योग्य होणार नाही. जागांसाठी घासाघीस करण्याचा माझा हेतू नाही. बिहारमध्ये एनडीएचे सरकार यावे, एवढीच आमची इच्छा असून त्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 1:04 am

Web Title: bjp ally kushwaha says no tussle in nda over seat sharing
Next Stories
1 पुलाचे बांधकाम कोसळल्याप्रकरणी आयआयटीच्या दोन प्राध्यापकांना अटक
2 पाकिस्तानच्या पहिल्याच ड्रोन हल्ल्यात ३ दहशतवादी ठार
3 कृष्णमूर्ती फाऊंडेशनचे विश्वस्त प्रा. कृष्णनाथ यांचे निधन
Just Now!
X