16 November 2018

News Flash

इंधनाचे दर वाढण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा दोघेही जबाबदार – मायावती

जर सरकारची इच्छा असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर नियंत्रण आणू शकतात असं मायावती यांनी म्हटलं आहे

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवर गुजरातमध्ये होत असलेल्या हल्ल्यांवरुन सुरु असलेले राजकारण बंद करण्याचे अपील केले आहे.

वाढत्या इंधन दरांसाठी काँग्रेस आणि भाजपा दोघेही समान जबाबदार असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. काँग्रेसने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. २१ विरोधी पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. दरम्यान मायावती यांनी भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.

‘भाजपादेखील तेच चुकीचं आर्थिक धोरण स्विकारत आहे, जे काँग्रेसप्रणित युपीए-2 सरकारने तयार केलं होतं. चुकीच्या आर्थित धोरणामुळेच २०१४ मध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली होती’, असं मायावती यांनी म्हटलं आहे. वाढत्या इंधन दराविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला भाजपा आणि काँग्रेस दोघेही समान जबाबदार असल्याचंही मायावती यांनी म्हटलं आहे.

‘युपीए-२ सरकारने २०१० मध्ये पेट्रोलच्या किंमतीवरील नियंत्रण उठवलं होतं, आणि हीच चूक एनडीए सरकारने केली असून त्यांनी १८ ऑक्टोबर २०१४ रोजी डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण उठवलं. बहुमतासोबत सरकार स्थापन केल्यानंतर एनडीए सरकारने पेट्रोलवरील युपीए सरकारची योजना तशीच लागू ठेवली नाही तर डिझेलवरील नियंत्रणही उठवलं, यामुळे महागाई वाढली’, असं मायावती यांनी म्हटलं आहे. जर सरकारची इच्छा असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर नियंत्रण आणू शकतात असं मायावती बोलल्या आहेत.

First Published on September 12, 2018 8:50 am

Web Title: bjp and congress equally responsible for petrol diesel rate hike