29 May 2020

News Flash

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात भाजप-काँग्रेसचे अंतर्गत साटेलोटे- केजरीवाल

देशाला बीए किंवा एमए असलेल्या पंतप्रधानाची नव्हे तर सच्च्या पंतप्रधानाची गरज आहे.

गुजरातमधील उनामध्ये गोरक्षक संघटनेच्या तरुणांनी चार दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वळाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही फक्त तुम्हाला शिव्या देऊ, अटक करणार नाही, असे मोदींनी सोनिया गांधींना सांगितले आहे. या मोबदल्यात सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रकरणाबद्दल मौन बाळगून आहे. हे म्हणजे काँग्रेस आणि भाजपमधील साटेलोटे असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आम आदमी पक्षातर्फे (आप) आज दिल्लीत ऑगस्टा वेस्टलँडच्या मुद्द्यावरून जोरदार निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एमए फर्स्ट क्लास’ 
यावेळी केजरीवाल यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने उल्लेख केलेल्या सर्वांना अटक करा आणि त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, केजरीवाल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पदवी प्रकरणावरून लक्ष्य केले. मोदी यांच्याकडे खरी पदवी नसेल तर त्यांनी एकदा देशवासियांची माफी मागावी. देशाला बीए किंवा एमए असलेल्या पंतप्रधानाची नव्हे तर सच्च्या पंतप्रधानाची गरज असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
मोदींची पदवी वेबसाईटवर प्रसिद्ध करा, केजरीवाल यांची दिल्ली विद्यापीठाकडे मागणी 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 11:39 am

Web Title: bjp and congress have internal setting over agustawestland says arvind kejriwal
Next Stories
1 काँग्रेसची ‘लोकशाही बचाव’ रॅली
2 ‘ऑगस्टा’प्रकरणी डोंगर पोखरून अदृश्य उंदीर!
3 सूर्यापेक्षा ६६ कोटी पट वस्तुमानाचे कृष्णविवर शोधण्यात यश
Just Now!
X