News Flash

भाजपाची नवी टीम जाहीर; तेजस्वी सूर्या युवा मोर्चा अध्यक्ष, मुकुल रॉय राष्ट्रीय उपाध्यक्षपदी

बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले बदल

संग्रहित (PTI)

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. यामध्ये कर्नाटकातील भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. रमन सिंह, मुकुल रॉय, अन्नपूर्णा देवी, बैजयंत जय पांडा यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मार्चा अध्यक्षपदी आणि राजकुमार चहर यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

त्याचबरोबर भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सीटी रवी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा- पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनाही स्थान

भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या यादीत महाराष्ट्रातून माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची देखील वर्णी लागली आहे. त्याचबरोबर सुनील देवधर, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जमाल सिद्दीकी यांची अल्पसंख्यंक मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 5:05 pm

Web Title: bjp announces new team tejaswi surya yuva morcha president mukul roy as national vice president aau 85
Next Stories
1 सर्व काही स्क्रिप्टेड आहे; मोदींना ‘सपनो का सौदागर’ यासाठीच तर म्हणतात… – दिग्विजय सिंह
2 “चीनमधून करोना आलाय ही गोष्ट कधीच विसरणार नाही, सत्ता मिळाली तर…,” डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3 ‘अलर्ट राहा, भारत अचानक हल्ला करु शकतो’, निवृत्त चिनी जनरलने बोलून दाखवली भीती
Just Now!
X