News Flash

मोदींवर टीका केल्याने भाजप संतप्त

केंद्रीयमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जातीवाचक टीका केल्याने त्यांनी व काँग्रेसने मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी भाजपतर्फे शनिवारी करण्यात आली.

| August 18, 2013 03:40 am

मोदींवर टीका केल्याने भाजप संतप्त

केंद्रीयमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जातीवाचक टीका केल्याने त्यांनी व काँग्रेसने मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी भाजपतर्फे शनिवारी करण्यात आली.
आझाद यांनी नुकताच मोदी यांचा गंगू तेली असा उल्लेख केला होता. मोदी हे संबंधित समाजातून आले असल्याने त्यांनी हा शब्द वापरला होता. या टीकेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. आझाद यांनी केवळ मोदी यांचाच अपमान केलेला नाही, तर त्या समाजाचाही अवमान केला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ता शहानवाझ हुसेन यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे अन्य प्रवक्ता प्रकाश जावडेकर यांनीही आझाद यांचा समाचार घेतला. आझाद यांनी अशी टीका करून देशातील सर्व अन्य मागासवर्गीयांचा व पर्यायाने देशाचाच अवमान केला आहे. त्यांनी हे शब्द त्वरित मागे घ्यावेत व त्यांच्यासह काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 3:40 am

Web Title: bjp annoyed of criticising to on modi
टॅग : Bjp,Congress,Narendra Modi
Next Stories
1 निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेसची परंपरा नाही
2 फिलिपाइन्स : बोट दुर्घटनेत १७१ बेपत्ता
3 इजिप्तमध्ये नव्याने रक्तपात
Just Now!
X