कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आपल्याला काँग्रेससोबत राहून शंकराप्रमाणे हलाहल अर्थात विष पचवावे लागते आहे, असे म्हटले. त्यावर भाजपाने कुमारस्वामी यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. कुमारस्वामी आपले म्हणणे मांडत होते त्यावेळी त्यांना रडू कोसळले. मात्र यावर भाजपाने त्यांची खिल्ली उडवली आहे. कुमार स्वामी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला जातो आहे असे म्हणत भाजपाने त्यांच्या रडण्याची आणि त्यांच्या विष पचवावे लागते आहे या म्हणण्याची खिल्ली उडवली.

आपल्या देशात अनेक उत्कृष्ट अभिनेते आहेत, ते हुशारही आहेत. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला जातो आहे तो कुमारस्वामी यांनाच दिला जातो आहे. कारण कुमारस्वामी यांनी रविवारी आपल्या अभिनयाचा उत्तम नमुना सादर केला आहे. आपल्या अशा अभिनयातून कुमारस्वामी यांनी कायमच जनतेला मूर्ख बनवले आहे असाही आरोप भाजपाने केला.

बेंगळुरू या ठिकाणी १५ तारखेला झालेल्या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना रडू कोसळले. काँग्रेससोबत आघाडी करणे म्हणजे हलाहल अर्थात विष पचवण्यासारखे आहे असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले. यावर आज केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनीही टीका केली. देशाला कुमारस्वामींसारख्या ट्रॅजेडी किंगची गरज नाही अशी टीका त्यांनी केली. त्यातच भाजपानेही कुमार स्वामींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला जातो आहे असे म्हणत खिल्ली उडवली.