29 September 2020

News Flash

भाजपा म्हणते, “तो ‘सिली बॉय’ राहुल को धोपटेंगे ना”

"सच्चाई के साथ गुलू गुलु करेगा तो धोपटेंगे ना इसको", असे भाजपाने ट्विटरवर म्हटले आहे.

भाजपानेही ट्विटर अकाऊंटवरुन राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

भाजपामध्ये थोडीफार हिम्मत असलेले नितीन गडकरी एकमेव नेते आहेत, असे विधान करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपाने बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. भाजपाने गल्ली बॉय या चित्रपटातील आलिया भटच्या एका डायलॉगचा आधार घेत राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ‘सच्चाई के साथ गुलू गुलू करेगा तो धोपटेंगे ना इसके’ असा टोला भाजपाने राहुल गांधी यांना लगावला आहे. हा टोला लगावताना भाजपाने ‘सिली बॉय (Silly Boy) असा हॅशटॅगही दिला आहे.

राहुल गांधी आणि नितीन गडकरी यांच्यात सध्या सोशल वॉर रंगले आहे. ‘गडकरीजी तुमचे कौतुक! भाजपामध्ये थोडीफार हिम्मत असलेले तुम्ही एकमेव नेते आहात. आता राफेल घोटाळा, अनिल अंबानी, शेतकऱ्यांमधली अस्वस्थतता, संस्थांचे नुकसान यावर सुद्धा काहीतरी बोला’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. या ट्विटवर नितीन गडकरी यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते.

‘माझ्या हिम्मतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण आश्चर्य याचे वाटते की, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतानाही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला माध्यमाकडून ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हे मोदीजी आणि आमच्या सरकारचे यश आहे की, तुम्हाला आमच्यावर हल्ला करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत’, असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते.

भाजपानेही ट्विटर अकाऊंटवरुन राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. “सच्चाई के साथ गुलू गुलु करेगा तो धोपटेंगे ना इसको”, असे भाजपाने ट्विटरवर म्हटले आहे. यात भाजपाने पुढे #SillyBoy असे देखील म्हटले आहे.

भाजपाचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा कल्पकतेने वापर केल्याबद्दल अनेकांनी ट्विटचे कौतुकही केले आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आगामी काळात दोन्ही पक्षांमधील सोशल वॉर आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 10:16 am

Web Title: bjp calls rahul gandhi silly boy says dhoptenge na isko over nitin gadkari tweet
Next Stories
1 प्रियंका गांधींबाबत अश्लिल टिप्पणी करणाऱ्याला अटक
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 माझ्या हिंमतीला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, गडकरींचा राहुल गांधींवर पलटवार
Just Now!
X