03 June 2020

News Flash

भाजप उमेदवाराला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

भाजपचे नौशेरा मतदारसंघातील उमेदवार रवींदर रैना यांना जबरी मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पीडीपीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

| December 21, 2014 01:58 am

भाजपचे नौशेरा मतदारसंघातील उमेदवार रवींदर रैना यांना जबरी मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पीडीपीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या रैना यांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपने या हल्ल्यासाठी पीडीपीवर टीका केली असून, हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेण्याचे ठरवले आहे. या गुन्हय़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे राजौरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहम्मद हबीब यांनी सांगितले.या हल्ल्यात भाजपचे तीन तर पीडीपीचे पाच कार्येकर्ते जखमी झाले होते. जखमींमध्ये भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष रैना यांचा समावेश आहे.
असे हल्ले सहन केले जाणार नाही असा इशारा भाजप प्रवक्ते सुनील सेठी यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2014 1:58 am

Web Title: bjp candidate beaten up by pdp
टॅग Pdp
Next Stories
1 लष्कर-ए-तोयबा संघटनेला अर्थपुरवठा सुरूच
2 दहशतवादी दयेस पात्र नाहीत -ममनून हुसेन
3 ’जनता परिवाराच्या एकत्रीकरणाची तारीख निश्चित नाही ’
Just Now!
X