News Flash

कर्नाटकात भाजपाचा जल्लोष, पण देशभरात लोकशाहीच्या पराभवाचा शोक: राहुल गांधी

कर्नाटकमधील भाजपा- काँग्रेसमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपाने सत्तास्थापन केली असतानाच दुसरीकडे काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.

संग्रहित छायाचित्र

कर्नाटकमध्ये भाजपाने सत्तास्थापन केली असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपा कर्नाटकमध्ये त्यांच्या ‘पवित्र’ विजयाचा जल्लोष करत आहे. पण दुसरीकडे देशभरात लोकशाहीच्या पराभवावर शोक व्यक्त केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमधील भाजपा- काँग्रेसमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपाने सत्तास्थापन केली असतानाच दुसरीकडे काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भाजपावर निशाणा साधला. ‘एकीकडे भाजपा कर्नाटकमधील विजयाचा जल्लोष करत असेल, पण दुसरीकडे भारतात लोकशाहीच्या पराभवामुळे शोक व्यक्त केला जाईल. भाजपाकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही त्यांनी हा घाट घातला. ही संविधानाची थट्टाच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 11:07 am

Web Title: bjp celebrates its hollow victory india will mourn the defeat of democracy says rahul gandhi
Next Stories
1 जर मी येडियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती – पी चिदंबरम
2 कर्नाटकात काँग्रेसचे दोन आमदार गायब
3 येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन
Just Now!
X