पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अर्वाच्च भाषेचा वापर करत ट्विट करणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपने जोरदार प्रहार केला आहे. ज्या नेत्याला मुलगी आणि पत्नीच्या वयातील फरक समजत नाही. ते पंतप्रधान मोदींकडे बोट करत असल्याची टीका भाजप नेते लोकेंद्र पराशर यांनी केली आहे. लोकेंद्र पराशर हे मध्य प्रदेश भाजपचे माध्यम प्रभारी आहेत. ‘एएनआय’बरोबर बोलताना त्यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मुलगी आणि पत्नीच्या वयातील फरक माहीत नाही ते आमच्या पंतप्रधानांकडे बोट करतात, असे पराशर यांनी म्हटले आहे.

ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अर्वाच्च भाषेचा वापर केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी मोदींच्या समर्थकांना कथितरित्या ‘भक्त’ म्हणून संबोधले. तसेच मोदी आणि समर्थकांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती.

दिग्विजय सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये मोदींच्या फोटोसह तीन ओळी आहेत. त्यात ”मेरी 2 उपलब्धिया:1. भक्तों को चु**** बनाया 2. चु**** को भक्त बनाया!” असा उल्लेख केला आहे. त्यानंतर हे माझे ट्विट नाही, पण ते शेअर करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकलो नाही, असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे ‘मीम’ तयार करणाऱ्या व्यक्तीची माफीही मागितली.