27 May 2020

News Flash

‘तुम्ही अस्पृश्य आहात’, कर्नाटकमध्ये दलित खासदाराला नाकारला गावात प्रवेश

बेघर असणाऱ्यांसाठी घरं बांधून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ते गेले होते

कर्नाटकमध्ये खासदाराला दलित असल्याने गावात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेगळी जात असल्याच्या कारणाने ए नारायणस्वामी यांना गावकऱ्यांनी गावात प्रवेश करु दिला नाही. ए नारायणस्वामी चित्रदुर्ग येथील भाजपा खासदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. नारायणस्वामी काही डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावाला भेट देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. बेघर असणाऱ्यांसाठी घरं बांधून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ते गेले होते.

तुमकूर जिल्ह्यातील पावगाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. सोमवारी नारायणस्वामी बायकॉन कंपनीचे प्रतिनिधी आणि नारायण सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या काही प्रतिनिधींना सोबत घेऊन परिसराची भेट देण्यासाठी गेले होते. गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

खासदार नारायणस्वामी अधिकाऱ्यांना घेऊन पोहोचले तेव्हा ग्रामस्थांनी तुम्ही अस्पृश्य असल्याचं त्यांना प्रवेश नाकारला. नारायणस्वामी यांच्यासोबत आलेल्या लोकांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गरिबांची मदत करण्यासाठी ते आले आहेत असं सांगत त्यांना प्रवेश द्या अशी विनंती करण्यात आली. पण गावकरी तयार झाले नाहीत. त्यांनी गावाबाहेर एक खुर्ची ठेवली आणि नारायणस्वामी यांना तिथेच थांबण्यास सांगितलं.

काही ग्रामस्थांनी नारायणस्वामी यांना तुम्ही मागे फिरा, या गावात दलित किंवा कनिष्ठ जातीतील लोकांना प्रवेश नसल्याचं सांगितलं. नारायणस्वामी यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. काही वेळाने काही ग्रामस्थांनी त्यांना गावात प्रवेश कऱण्याची विनंती केली पण नारायणस्वामी यांनी नकार दिला. आपल्यामुळे गावात उगाच तंटा नको असल्याचं त्यांनी सांगितलं.

गावात प्रवेश न करताच अखेर नारायणस्वामी तेथून निघून गेले. आपल्याला जबरदस्ती किंवा पोलिसांच्या मदतीने गावात प्रवेश करायचा नव्हता असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “मला त्यांची विचारसरणी बदलायची आहे. याप्रकरणी मी कोणतीही तक्रार दाखल करणार नाही. अस्पृश्यता हे सत्य आहे. मन बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. कायदा हे बदलू शकत नाही,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 12:30 pm

Web Title: bjp dalit mp a narayanswami denied entry in village karnataka sgy 87
Next Stories
1 आठ फुटाच्या मगरीने शेतकऱ्यावर केला हल्ला; प्रसंगावधान दाखवल्याने वाचला
2 अमित शाह यांनी नाकारली एलिट कमांडो फोर्स NSG ची सुरक्षा
3 भिन्नलिंगी ग्राहकास मसाज करण्यावर दिल्लीत आता बंदी
Just Now!
X