28 February 2021

News Flash

‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’, दिल्लीत जागोजागी होर्डिंग्ज

भाजपाचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी हे होर्डिंग्ज लावले असून यापूर्वीच माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल

शीख विरोधी दंगलीत काँग्रेसचा सक्रीय सहभाग होता असा आरोप केला जातो. दरम्यान, दिल्लीत अनेक ठिकाणी 'राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग' असा आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केला होता. त्यानंतर भाजपा आणि पंजाबमधील अकाली दलाने या मुद्यावरून काँग्रेसला घेरले आहे. शीख विरोधी दंगलीत काँग्रेसचा सक्रीय सहभाग होता असा आरोप केला जातो. दरम्यान, दिल्लीत अनेक ठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ असा आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. फलकांवर प्रकाशक तेजिंदरपालसिंग बग्गा असे नाव आहे. मागील आठवड्यात राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशीही बग्गा यांनी राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे  (जमावाकडून होणारी हत्या) जनक असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी यावरून मोठा वाद झाला होता. माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी बग्गा यांच्याविरोधात काँग्रेसने दिल्ली पोलिसांत तक्रारही केली होती.

१९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या भूमिकेमुळे झालेल्या दंगलीतून शीख समाज आज ही सावरला नसल्याचे बग्गा यांनी म्हटले होते. शीख दंगलीप्रकरणी काँग्रेसला कधीच माफ केले जाणार नाही, असे ते म्हणाले होते. आता या होर्डिंग्जमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत उसळलेल्या त्या दंगलीत तीन हजार शिखांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात पुन्हा राहुल यांना १९८४ सालच्या शीख विरोधी दंगल आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राहुल म्हणाले होते की, मनमोहन सिंग आमच्या सर्वांच्या वतीने बोलले. मी स्वत: हिंसाचाराने पीडित आहे. त्यामुळे त्या वेदना काय असतात हे मला चांगले ठाऊक आहे. पृथ्वीवर कोणाच्याही विरोधात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार करण्याला माझा विरोध आहे. जेव्हा कोणाला वेदना होतात तेव्हा ते पाहून मला दु:ख होते. त्यामुळे मी शीख विरोधी दंगलीचा निषेध करतो. जे कोणी अशा प्रकारच्या हिंसाचारात सहभागी आहेत त्यांना शासन झालेच पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 9:47 am

Web Title: bjp delhi spokeperson tajinder pal singh bagga published hording of rajiv gandhi the father of mob lynching
Next Stories
1 निवृत्तीनंतर कुठलं तरी अध्यक्षपद द्या, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचं योगींना पत्र
2 जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
3 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X