२०१९ च्या निवडणुकांच्या आधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरू होईल असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबाद मध्ये केल्याचे वृत्त आले होते. मात्र आता भाजपाने या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. खरे तर राम मंदिर आणि बाबरी प्रकरण न्याय प्रविष्ट असताना अमित शाह यांनी हे वक्तव्य कसे केले याची चर्चा सुरु झाली. त्यातच आता भाजपाने यू टर्न घेत असे काहीही वक्तव्य अमित शाह यांनी केले नसल्याचे म्हटले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधीच अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरू होईल असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. राम मंदिर-बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशात अमित शाह यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपातील नेत्यांसोबत अमित शाह यांची एक बैठक शुक्रवारी हैदराबादमध्ये झाली त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात आले. निवडणुका जाहीर होण्याआधीच राम मंदिर निर्मितीच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले होते. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी शेखरन यांनी पत्रकारांना बैठकीत काय घडले हे सांगताना अमित शाह यांनी केलेले हे वक्तव्य सांगितले. आता मात्र भाजपाने अशी काही चर्चाच झाली नसल्याचे म्हटले आहे.