15 December 2018

News Flash

बसपाच्या साथीने सपा यशस्वी होईल असे वाटले नव्हते : भाजपा

भविष्यात विरोधक एकत्र आल्यास नवी रणनीती आखू : मौर्य

केशव प्रसाद मौर्य

उत्तर प्रदेशातील ‘गोरखपूर’ आणि ‘फुलपूर’ या दोन लोकसभेच्या जागांवरील प्रतिष्ठेच्या  पोटनिवडणुकीत भाजपाला पराभावाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.  यांपैकी फुलपूरच्या जागेवर सपाला बसपाच्या साथीने यश मिळेल असे वाटले नव्हते, अशी स्पष्ट कबुली उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिली आहे.


उत्तरप्रदेशातील ‘गोरखपूर’ हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. तर, ‘फुलपूर’ हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा मतदारसंघ आहे. या दोघांनी या जागांवरून खासदारकीचा राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात होत असलेली पोटनिवडणूक भाजपासाठी खूपच प्रतिष्ठेची होती. मात्र, या दोन्ही जागांवर त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे. विशेष बाब म्हणजे भाजापाला शह देण्यासाठी बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) या दोन्ही कट्टर विरोधी पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली. यासाठी बसपाने सपाच्या उमेदवारांना पाठींबा दर्शवला होता. त्यामुळे सपाचे उमेदवार या दोन्ही जागांवर मोठ्या फरकाने निवडून आले.

या पराभवावर प्रतिक्रया देताना मौर्य म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसपाची मते सपाला मिळतील याची आम्हला कल्पना नव्हती. अंतिम निकालानंतर आम्ही याचे विश्लेषन करु. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, बसपा आणि सपा एकत्र आल्यास त्यासाठी नवी रणनीती आखू असेही ते यावेळी म्हणाले.

First Published on March 14, 2018 4:48 pm

Web Title: bjp did not think sp could succeed with the help of bsp