24 January 2021

News Flash

आमदार आकाश विजयवर्गीयला भाजपाची नोटीस

नगरपालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने केली होती मारहाण

नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणारे आमदार आकाश विजयवर्गीय यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या अगोदर मंगळवारी पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आमदार आकाश विजयवर्गीय यांना घेऊन मोठे विधान केले होते. शिवाय नाराची व्यक्त करत म्हटले होते की, कोणाचाही मुलगा असो, पक्षातून काढायला हवा. यावेळी मोदींनी आकाश विजयवर्गीय यांचे नाव घेतले नव्हते.

यासंबंधी भाजपाचे खासदार राजीव प्रताप रूडी यांनी सांगितले की, पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आकाश विजयवर्गीय यांच्याबद्दल पंतप्रधान मोदी अतिशय नाराज आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची वर्तवणुक कधीच खपवून घेतली जाणार नाही. मग तो कुणाचाही मुलगा किंवा खासदार असला तरी फरक पडणार नाही. अशी माणसं पक्षात नसालया हवीत कोणालाही गर्व नसला पाहिजे व योग्य वर्तवणुक ठेवायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 6:02 pm

Web Title: bjp disciplinary committee has issued a showcause notice to mla akash vijayvargiya msr87
Next Stories
1 खूशखबर! बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा
2 तरूणांची माथी भडकविणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं परदेशात सुखरूप
3 दारात पडलेला फोन उचलताना तरुणी ट्रेनमधून पडली, मृतदेहाचे दोन तुकडे
Just Now!
X