04 March 2021

News Flash

नथुरामसंबंधीच्या वक्तव्याप्रकरणी साध्वीला माफी मागावी लागेल-भाजपा

या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल, भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल. असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम बद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय पक्षांकडून भाजपावर टीका होऊ लागल्यानंतर भाजपा प्रवक्ते नरसिंहाराव यांनी असे सांगितले आहे.

भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून नव्या वादाला सुरूवात करून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 4:29 pm

Web Title: bjp does not agree with pragya singh thakurs statement
Next Stories
1 चौकीदाराच्या मुलाने बोर्डाच्या परीक्षेत मिळवले ९९.८ टक्के
2 धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरु असताना तोंडात स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू
3 पश्चिम बंगालमध्ये भाजपानेच हिंसाचार घडवून आणला; जयंत पाटलांचा थेट आरोप
Just Now!
X