News Flash

अटलबिहारी वाजपेयींच्या भाच्याला भाजपाकडून उमेदवारी

भाजपाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे

(संग्रहीत छायाचित्र)

भाजपाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तिकीट वाटपावरुन सध्या उमेदवारांमध्ये नाराजी आणि संघर्षाचं वातावरण असतानाच ही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने अनेक महत्त्वाची नावे जाहीर केली असून यामध्ये दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाच्याचं नाव आहे. मोरेनाचे खासदार अनुप मिश्रा यांनाही भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.

ग्वालियर-चंबळ भागातील ब्राम्हण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप मिश्रा यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून डावललं जात होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपाला निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता असून त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे.

संसदेत पक्षाला घरचा अहेर देत टीका केल्याने अनुप मिश्रा चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची योग्य अंमलबजावणी केली जात नसून, संबंधित लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची टीका त्यांनी केली होती. अनुप मिश्रा यांचा नातेवाईक 2010 मध्ये एका हत्या प्रकरणात अडकला होता. यानंतर अनुप मिश्रा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळातून पायउतार झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 4:44 pm

Web Title: bjp gave ticket to atal bihari vajpayees nephew
Next Stories
1 आयएनएस अरिहंत शत्रूसाठी खुले आव्हान; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव
2 रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या तीन गँगमनला रेल्वेने उडवलं
3 विकृती! भाषणानंतर परतणाऱ्या काँग्रेस नेत्याची जीभ कापली, भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप
Just Now!
X