28 January 2021

News Flash

भाजपा कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या

अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु

फोटो सौजन्य-एएनआय

बंगळुरुत एका भाजपा कार्यकर्त्याची चाकून भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद अन्वर असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. बंगळुरुच्या चिकमगलोरचे जनरल सेक्रेटरी पद त्यांना देण्यात आले होते. शुक्रवारी रात्री गोवरी कलुवे भागात दोन बाईकस्वारांनी येऊन त्यांना चाकून भोसकून ठार केले अशी माहिती मिळते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मोहम्मद अन्वर यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली त्यांच्यावर तीनवेळा वार करण्यात आले अशीही माहिती समोर येते आहे. हल्ला झाल्यानंतर अन्वर कोसळले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 9:09 am

Web Title: bjp general secretary of chikmagalur anwar was killed by bike borne assailants
Next Stories
1 देशात स्वतंत्र न्यायव्यस्थेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही-चेलमेश्वर
2 सैन्याचे ‘ऑपरेशन ऑल आऊट २’; हे टॉप ९ दहशतवादी हिटलिस्टवर
3 आयसिसच्या काश्मीरमधील म्होरक्याचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट?
Just Now!
X