लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने १५, काँग्रेसने ९ तर अपक्षांनी २ जागा पटकावल्या.
सोमवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपची सुरुवातीपासून आघाडी राहिली. भाजप, काँग्रेस यांनी २६, ‘आप’ने १९ तसेच अपक्ष उमेदवारांनी २३ जागा लढवल्या.
लेहमध्ये ६५.०७ टक्के मतदान झाले होते. लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या या सहाव्या निवडणुका गुरुवारी झाल्या होत्या. भाजपने तुर्तिक, हुंदार, दिसकीट, तेगर, पानामिक, तांगत्से या जागा जिंकल्या. अपक्षांनी चुशुलची जागा जिंकली आहे.
एकूण ८९७७६ मतदार असून त्यात ४५०२५ महिला आहेत. २६ मतदारसंघातील २९४ केंद्रांवर मतदान झाले. भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी २६ धरून एकूण ९४ उमेदवार िरगणात होते. काँग्रेस व भाजपशिवाय आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच नशीब अजमावण्यासाठी १९ उमेदवार उभे केले होते. २३ अपक्ष उमेदवार होते. नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या स्थानिक पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 12:01 am